नवी दिल्लीः गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या खोटे आणि विरोधात मोहीम राबवल्यानंतरही या अॅपचे निर्मूलन करण्यात अद्याप यश आलेले नाही. यासारख्या अॅपची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गुगल प्ले स्टोअरवरून धोकादायक २०५ अॅप तब्बल ३.२ कोटी वेळा डाउनलोड करण्यात आल्याची माहिती एका अहवालावरून समोर आली आहे. रिसर्चर सुकास स्टेफँकोच्या अहवालानुसार, २०५ धोकादायक अॅप तब्बल ३.२ कोटी वेळा डाउनलोड करण्यात आले आहेत. यातील बहुतांश अॅप हे जाहिरातीमागे लपलेले असतात. यासारख्या १८८ अॅपला १.९२ कोटी वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे. या यादीत उर्वरित खोटे अँटिव्हायरस टूल्स, अॅड फ्रॉड आणि सब्सक्रिप्शन स्कॅमच्या अॅप्सचा समावेश आहे. रिसर्चरने नेक्स्ट वेबला ही माहिती दिली असून त्यात म्हटले की, समावेश करण्यात आलेले सर्व अॅप्स आणि त्यांची आकडेवारी २०१९ च्या इन्फोसेक कम्युनिटीकडून प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्च, ब्लॉग्स, रिपोर्ट्स आणि ट्विट्सच्या आधारावर आहे. सध्या ही सर्व अॅप्स उपलब्ध नाहीत. परंतु, ही अॅप्स ३.२ कोटी वेळा डाउनलोड झालेली आहेत. खोटे आणि धोकादायक अॅप्सचे निर्मूलन करण्यासाठी गुगल प्ले प्रोटेक्ट नावाचे टूल प्रमोट करतेय. हे टूल धोकादायक अॅप्ससंबंधी ग्राहकांना अलर्ट करण्याचे काम करतेय. तसेच काही वेळा ते धोकादायक अॅप्सना काढून टाकण्याचे काम करतेय. त्यानंतर नोटिफिकेशन पाठवून अॅप डिलिट करण्याची ग्राहकांना सूचना करते, असेही या अहवालात म्हटले आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yqx6QB
Comments
Post a Comment