सॅमसंग गॅलेक्सी A10s लाँच, किंमत ९,४९९ ₹

नवी दिल्लीः सॅमसंगचा गॅलेक्सी A10s हा स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला या फोनचा पुढचा अवतार A10s हा स्मार्टफोन आहे. भारतात या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये इतकी आहे. A10s च्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत ९ हजार ४९९ रुपये तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १० हजार ४९९ रुपये इतकी आहे. हा नवीन फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या तीन रंगात उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतात या फोनची विक्री उद्यापासून म्हणजेच २८ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. ऑनलाइन रिटेलर्स, रिटेल स्टोर्स, सॅमसंग इंडिया ई-शॉप आणि सॅमसंग ओपरा हाउस यावरून ग्राहकांना हा फोन खरेदी करता येऊ शकतो. दरम्यान, कंपनीनं आतापर्यंत लाँच ऑफरची कोणतीही घोषणा केलेली नाही. A10s ची वैशिष्ट्ये >> ६.२ इंचाचा इनफिनिटी व्ही. डिस्प्ले >> ७२०X१५२० पिक्सल रिझॉल्यूशन >> ऑक्टा-कोर प्रोसेसर >> ड्युअल रियर कॅमेरा सेटअप >> १३ मेगापिक्सलचा प्रायमरी तर २ मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा >> सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा सेन्सर >> ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZoNLzO

Comments

clue frame