64MPचा फोन सर्वात आधी भारतात लाँच होणार

नवी दिल्लीः जगातील पहिला ६४ मेगापिक्सलचा स्मार्टफोन सर्वात आधी भारतात लाँच करण्यात येणार आहे. रियलमी कंपनी सर्वात आधी हा फोन लाँच करणार होती. परंतु, कंपनीनं या फोनसंबंधी अधिक माहिती देणे टाळले आहे. तर दुसरीकडे शाओमीने आपल्या ६४ मेगापिक्सलचा फोन लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. चीनमधील एका ग्लोबल इव्हेंटमध्ये शाओमीने या फोनची घोषणा केल्याने जगातील पहिला ६४ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोनचा विक्रम शाओमीच्या नावावर जाणार आहे. सॅमसंगचा GW1 64MP सेन्सर पॉवर्डचा ६४ मेगापिक्सलचा स्मार्टफोन इमेजिंग टेक्नोलॉजी सर्वात आधी भारतात लाँच होणारी रेडमी स्मार्टफोन कंपनी असणार आहे. यावर्षीच्या ऑक्टोबरनंतर हा फोन कधीही भारतात लाँच करण्यात येऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे. या नवीन टेक्नोलॉजीच्या कॅमेरा फोनसंबंधी इंडियाचे व्यवस्थापिक संचालक मनु कुमार जैन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. सॅमसंगचा हा सेन्सर ९२४८x६९३६ पिक्सल रिझोल्यूशनसह ६४ मेगापिक्सलचे इमेज आउटपूट देईल. यात १०० डेसिबल पर्यंत एचडीआरचा रियल टाइम हार्डवेअर सपोर्ट देण्यात आला आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे यात एचडीआर क्षमता ६० डेसिबल पर्यंत आहे. रेडमी फोनमध्ये येणारा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा खूपच रियल फोटो क्लिक करू शकणार आहे. आणखी दुसरा एक १०० मेगापिक्सलचा कॅमेरा फोन लाँच करण्याची घोषणा शाओमीने केली आहे. शाओमी या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा सॅमसंगचा ISOCELL सेन्सरचा वापर करणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31rxsDR

Comments

clue frame