मुंबई: () चा आज दुसरा फ्लॅश सेल आहे. दुपारी १२ पासून फ्लिपकार्टवर आणि शाओमीच्या ऑनलाइन स्टोरवर सेल सुरू होणार आहे. शाओमीचा हा स्वस्त फोन ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे. गेल्या आठवड्यातील पहिल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला होता. कंपनीचे सीईओ मनु कुमार जैन यांनी सांगितलं की, या स्मार्टफोनला ग्राहकांची मोठी पसंती आहे. अधिकाधिक लोकांना तो खरेदी करता यावा यासाठी कंपनीनं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा फोन लाँच ऑफरमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. २ जीबी रॅम+१६ जीबी स्टोरेज व्हेरियंट ५९९९ रुपये आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजचा फोन ६१९९ रुपयांना मिळणार आहे. आज हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्टवर अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे हा फोन खरेदी केल्यास ५ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तर ग्राहकांना ईएमआय आणि एक्स्चेंज ऑफरमध्येही फोन उपलब्ध करून देणार आहे. शाओमीच्या ऑनलाइन स्टोरवर रेडमी ७ ए खरेदी केल्यास रिलायन्स जिओतर्फे १२५ जीबी डेटा फ्री आणि २२०० रुपये कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय ग्राहक ३९९ रुपये देऊन Mi प्रोटेक्ट सर्व्हिसही घेऊ शकतात.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JM4FT3
Comments
Post a Comment