रियलमी X चा आज सेल; 'या' ऑफर्स मिळणार

नवी दिल्ली ओप्पोचा सबब्रँड असलेल्या रियलमी एक्सचा आज दुपारी १२ वाजता सेल सुरू होणार आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरवरून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे, यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. () ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत १९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फ्लिपकार्टवरून एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. तसेच अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास ग्राहकांना ५ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. फ्लिपकार्टवरून नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय सुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांना २ हजार ८३४ रुपये प्रति महिना द्यावा लागणार आहे. हा फोन दोन रंगात (पोलर व्हाइट, स्पेस ब्लू कलर) उपलब्ध आहे. Realme X ची वैशिष्ट्ये >> ६.५३ इंचाचा विना नॉचचा एफएचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले >> ४८ मेगापिक्सलचा ड्युअर रियर कॅमेरा >> पॉप अप सेल्फी एएन कॅमेरा >> ४ जीबी रॅम, ८ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेज पर्याय >> Sony IMX471 सेन्सरसोबत १६ मेगापिक्सलचा एआय पॉप-अप कॅमेरा >> क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर >> ३७६५mAh क्षमतेची बॅटरी


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SRzr17

Comments

clue frame