World Emoji Day: भारतात 'या' इमोजीचा सर्वाधिक वापर

नवी दिल्ली फेसबुक, आणि डेटिंग अॅप या सारख्या सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या इमोजीचा आज जागतिक दिन आहे. सोशल मीडियावर चॅटिंग करताना आनंदी आणि ब्लोइंग किस देणाऱ्या या दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी म्हणजेच १७ जुलै रोजी जागतिक इमोजी दिन आहे. जागतिक इमोजी दिनाच्या पूर्वसंध्येला टेक कंपनी 'बोबल एआय'ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात दोन इमोजीचा समावेश आहे. आनंदाश्रू आणि ब्लोइंग अ किस इमोजी या दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यानंतर स्माइलिंग फेस विथ हार्ट आइज, किस मार्क, ओके हँड, लाउडली क्राईंग फेस, बिमिंग फेस विथ स्माईलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माईलिंग विथ सनग्लासेस या इमोजीचा वापर होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. व्हॉट्सअॅपवरही या इमोजी आहेत. सण आणि राष्ट्रीय उत्सव दरम्यान इमोटिकॉन्सचा वापर सर्वाधिक झाल्याचे यात म्हटले आहे. डेटिंग अॅपमध्ये अ विंक करताना आणि खाण्याचा आनंद घेतानाच्या इमोजीचा सर्वाधिक वापर झाल्याचे दिसले आहे. डेटिंग अॅपमध्ये आनंद व्यक्त करताना, फ्लर्टी आणि रोमांटिक इमोजीचा सर्वाधिक वापर होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XJ4q4Y

Comments

clue frame