नवी दिल्ली विवो झेड वन प्रोचा () आज दुसरा सेल फ्लिपकार्ट आणि कंपनीची वेबसाइट विवो डॉट कॉमवर () दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. कंपनीनं सुरू केलेल्या पहिल्या सेलला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने तो काही मिनिटांच्या आत संपला होता. ४ जीबी रॅम आणि ६४ स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९० रुपये तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७ हजार ९९० रुपये इतकी आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ७५० रुपयांचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन एकदा चार्ज केल्यास ४० तास सतत या फोनवर बोलू शकतो. तसेच ७ तासांपर्यंत सतत गेम खेळता येऊ शकतो. vivo Z1 Pro ची वैशिष्ट्ये >> ६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले >> २३४०X१०८० रिझोल्यूशन पिक्सल >> ३२ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा >> तीन रियर कॅमेरे, ८ मेगापिक्सल (पहिला), १६ मेगापिक्सल (दुसरा) २ मेगापिक्सल (तिसरा) >> ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NYwUU7
Comments
Post a Comment