सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुद्ध सूर असलेल्या देशद्रोही कटकारस्थानामध्ये सामिल असल्याचा संशय आहे.
सरकारने सुरू असलेल्या राज्यसभेत हा विषय मांडला असून, दोन्ही अॅपला 21 प्रश्नांची नोटीस पाठवली आहे आणि त्यांच्याकडून उत्तरे मागितली आहेत, त्याचबरोबर जर संबंधित प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दोन्ही अॅप कंपनीकडून मिळाली नाहीत, तर देशात दोन्ही अॅप लवकरात लवकर बंद होणार असल्याची माहिती देखील राज्यसभेत सरकारकडून देण्यात आली.
स्वदेशी जागरण मंचने केलेल्या आरोपानुसार, TIKTOK आणि HALO हे दोन्ही अॅप अॅंटी नॅशनल अॅक्टिविटीजना सक्रिय करत आहेत. TIKTOK अॅपवर याआधीही असे आरोप लावण्यात आले होते. काही वेळासाठी त्याला बंदही करण्यात आले होते.
TIKTOK आणि HALO अॅप यांनी दिलेली प्रतिक्रिया...
आम्ही भारतीय सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार आहोत आणि ती आमची जबाबदारी असेल. भारतात TIKTOK आणि HALO अॅपला पुढे घेऊन जाण्यासाठी पुढील तीन वर्षांत एक बिलियन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

from News Story Feeds https://ift.tt/2NZQxek
Comments
Post a Comment