रेडमीचा K20 आणि K20 प्रो आज लाँच होणार

नवी दिल्ली शाओमीचा बहुचर्चित रेडमी के २० आणि रेडमी के २० प्रो हे दोन मोबाइल आज लाँच करण्यात येणार आहेत. रेडमीची के२० सीरीजचे हे दोन्ही फोन पहिल्यांदाच बाजारात येत आहेत. आज दुपारी १२ वाजता एका खास कार्यक्रमात हे दोन्ही फोन लाँच करण्यात येणार आहेत. कंपनीच्या वेबसाइटवरून हे दोन्ही कार्यक्रम लाइव्ह पाहता येऊ शकणार आहेत. कंपनीचे K20, K20 Pro हे दोन फोन आज भारतात लाँच करण्यात येणार आहेत. या फोनमध्ये फोटोसाठी तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा तर दुसरा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. तिसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी के २० या फोनची किंमत साधारणपणे १६ हजार ९९९ ते १८ हजार ९९९ रुपये असण्याची शक्यता आहे. तर रेडमी के२० प्रोची किंमत २० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. K20, K20 Pro ची वैशिष्ट्ये >> ६.३९ इंचाचा एमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले >> इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर व अँड्रॉयड ९ पाई >> ऑक्टो-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर >> ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा >> १३ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा >> ऑक्टो-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर >> ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XNPxOU

Comments

clue frame