नवी दिल्ली नवनवीन मोबाइल वापरणाऱ्यांसाठी जुलै महिना खास आहे. या महिन्यात अनेक मोबाइल लाँच करण्यात येत आहेत. या आठवड्यात आणि के २० प्रो हे दोन मोबाइल उद्या १७ जुलै रोजी लाँच होणार आहेत. शाओमी कंपनीचे K20, K20 Pro हे दोन फोन उद्या भारतात लाँच करण्यात येणार आहेत. या फोनमध्ये फोटोसाठी तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा तर दुसरा कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. तिसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हे दोन्ही फोन उद्या लाँच होणार असले तरी या फोनची किंमत अद्याप समोर आली नाही. K20, K20 Pro ची वैशिष्ट्ये >> ६.३९ इंचाचा एमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले >> इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर व अँड्रॉयड ९ पाई >> ऑक्टो-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर >> ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा >> १३ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा >> ऑक्टो-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर >> ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NTkEEa
Comments
Post a Comment