नवी दिल्ली : Google Pay च्या माध्यमातून अनेक व्यवहार सध्या केले जात आहेत. त्यानंतर आता Google Pay ला टक्कर देण्यासाठी WhatsApp Pay लवकरच येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'व्हाट्सऍप' चालू वर्षात आपल्या पेमेंट सेवेचा संपूर्ण भारतात विस्तार करणार असल्याची माहिती कंपनीचे जागतिक प्रमुख विल कॅथकार्ट यांनी दिली.
WhatsApp ने गेल्या वर्षापासून जवळपास 10 लाख युजर्ससाठी प्रायोगिक तत्वावर ही सेवा उपलब्ध करुन दिली असून, भारतात या ऍपचा वापर करणाऱ्यांची संख्या सुमारे 40 कोटी इतकी आहे. 'व्हाट्सऍप'द्वारे एखादा संदेश पाठविण्यासारखे पैसे पाठविणे सोपे व्हावे, असा कंपनीचा मानस असल्याचे कॅथकार्ट यांनी सांगितले. यात आम्ही यशस्वी झालो तर, आर्थिक समावेशाला गती मिळण्यासाठी मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पेमेंट सेवेचा विस्तार करताना फोन पे, गुगल पे, पेटीएमसारख्या कंपन्यांचे तगडे आव्हान 'व्हाट्सऍप'समोर आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2SBz8XY
Comments
Post a Comment