ओप्पोचा F11 Pro फोन लाँच, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने भारतात आपला स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत २३ हजार ९९० रुपये इतकी असून तो अॅमेझॉनच्या प्राईम डे सेलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी कंपनीने ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा पर्याय सुद्धा दिला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने २५६ जीबी पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. एकदा हा फोन चार्ज केल्यास १५.५ तासांपर्यंत याची बॅटरी चालू शकते, असा कंपनीनं दावा केला आहे. Oppo F11 Pro ची वैशिष्ट्ये >> ६.५३ इंचाचा डिस्प्ले >> १०८०X२३४० रिझॉल्यूशन >> ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज >> मेडियाटेक हेलिओ पी७० प्रोसेसर >> ४८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा >> १६ मेगापिक्सलचा एवन पॉप अप सेल्फी कॅमेरा >> ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LpPIJx

Comments

clue frame