पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 'चांद्रयान-2' या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ध्रुवीय प्रक्षेपक यान अर्थात 'जीएसएलव्ही-मार्क-3' द्वारे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या अग्निबाणाचे (रॉकेट) प्रक्षेपण आधी पेक्षा पन्नास टक्के अधिक प्रभावी ठरल्याचे इस्रोचे प्रमुख के. सीवन यांनी म्हटले आहे. यामुळे जितक्या उंचीवर 'चांद्रयान-2' उद्या जायला हवे होते तेवढ्या उंचीवर ते आजच पोचले आहे. त्यामुळे 'चांद्रयान-2' चंद्रापर्यंत नेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या चमुला याचा फायदा झाला आहे. तसेच भारताने 'क्रायोजेनिक' इंजिन वापरण्याची चाचणी अधिक प्रभावीपणे यशस्वी केली आहे.
Launch of Chandrayaan 2 by GSLV MkIII-M1 Vehicle https://t.co/P93BGn4wvT
— ISRO (@isro) July 22, 2019
'जीएसएलव्ही मार्क -3'ने अपेक्षेपेक्षा जास्त प्रभावी काम केल्यामुळे चांद्रयानाचे इंधनही वाचले आहे. आणि त्याच्या कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या जोरावर 4 टन वजनाचे उपग्रह आणि अवकाशयान यशस्वीपणे पृथ्वीच्या बाह्यतम कक्षेत प्रक्षेपित करणे शक्य होणार असल्याचे के. सीवन यांनी सांगितले आहे.
भारताची भविष्यातील मानव मोहीम 'गगनयान' आणि अवकाशात 300 ते 400 किलोमीटर उंचीवर 'अवकाशस्थानक' उभारण्याच्या मोहिमेला बळ भेटणार आहेत.

from News Story Feeds https://ift.tt/2JMEXiN
Comments
Post a Comment