'असा' असणार बजेटमधला 'नोकिया ६.२' मोबाइल

मुंबई ऑगस्ट महिन्यात नोकिया आपले दोन मोबाइल मॉडेल '' आणि 'नोकिया ७.२' लाँच करण्याची शक्यता आहे. यातील 'नोकिया ६.२'ची फिचर्ससमोर आली आहेत. एचएमडी ग्लोबल कंपनीने २०१७मध्ये 'नोकिया ६' स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर २०१८ मध्ये 'नोकिया ६.१' लाँच केला होता. आता नोकियाच्या चाहत्यांना 'नोकिया ६.२' ची प्रतिक्षा आहे. 'नोकिया ६.२' आणि 'नोकिया ७.२' हे दोन्ही फोन पहिल्यांदा चीनमध्ये लाँच होणार असल्याची माहिती आहे. असा असणार नोकिया ६.२ 'नोकिया ६.२' स्मार्टफोनमध्ये ६.३९ इंचाचा फुल एचडी प्योरडिस्प्ले असणार आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंचहोल असण्याची चर्चा आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर असू शकतो. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असू शकतो. तर, बॅटरी क्षमता ३३०० एमएएच इतकी असणार आहे. फोनमध्ये २० मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर असून ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल लेंस आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असू शकतो. तर फ्रंट कॅमेऱ्याबाबत असून कोणती माहिती समोर आली नाही. याआधी फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल असल्याची चर्चा होती. किंमत किती?चीनमध्ये या फोनच्या ४ जीबी मॉडेलची किंमत ११९९ युआन म्हणजे जवळपास १२ हजार रुपये असेल. तर, ६ जीबी वेरिएंटची किंमत १४९९ युआन जवळपास १५००० हजार रुपये असू शकते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OdYIDX

Comments

clue frame