मुंबईः मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरनं युजर्ससाठी एक नवं फिचर आणत आहे. ट्विटरवरील थ्रेड अचानक डिलीट झाल्यास ते थ्रेड का गायब झाले याचं स्पष्टीकरण देणार आहे. येत्या आठ दिवसांत हे फिचर युजर्सना दिसणार आहे. बऱ्याचदा आपणं एकाचवेळी सलग दोन ते चार वेळा ट्वीट करतो. त्या ट्वीटवर अनेक कमेंटदेखील येतात. मग अचानक त्यातील काही कमेंट गायब होतात. व 'This tweet is unavailabe' असं दिसतं. त्यामुळं युजर्सना नेमकं ट्वीट कशामुळं गायब झालं याचा अंदाज बांधता येत नाही. टविटरच्या या नव्या फिचरमुळं ते ट्वीट का गायब झालं याचं कारण स्पष्ट होणार आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xYqAkv
Comments
Post a Comment