मुंबई: मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन 'मोटो ई-६' स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन 'मोटो ई-५' या फोनचं नेक्स्ट वर्जन आहे असं म्हणता येईल. या नवीन फोनमध्ये अनेक अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. असं असलं तरी या फोनमध्ये 'मोटो ई-५'च्याच हार्डवेअरचा वापर करण्यात आलाय. हा फोन विकत घेण्यासाठी भारतीय ग्राहकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण, सध्या तरी फक्त अमेरिकेत हा फोन लॉन्च करण्यात आलाय. अमेरिकेत याची किंमत $१४९.९९ म्हणजेच १०,३०० रुपये इतकी आहे. भारतात हा फोन कधी लॉन्च होणार किंवा यांची किंमत किती असणार? याची कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आली नाही. 'मोटो ई-६'चे फीचर्स:
- ५.५ इंचाचा LCDडिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन ४३५ SoC प्रोसेरस
- २ जीबी रॅम व १६ जीबी इंटरनल स्टोरेज
- कॅमेरा सेटअप: १३ मेगापिक्सल रियर कॅमरा, ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LHLXj3
Comments
Post a Comment