मस्तच! ३० मिनिटात चार्ज होणार 'ही' पॉवर बॅंक

मुंबई: मोबाइल पॉवर बँक, हे असे एक अती महत्त्वाचं असं उपकरण आहे..ज्या माध्यमातून मोबाइल, टॅब्लेटसारखी उपकरणे विनाव्यत्यय सहज चार्ज केली जाऊ शकतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हल्ली बाजारात विविध आकाराच्या, कमी-जास्त क्षमतेच्या पॉवर बँक सहज उपलब्ध आहेत. त्यामुळं कुठेही जा, बॅटरी उतरल्यास चार्जिंगसाठी या उपकरणाचा वापर केला जात आहे. २०००० mAh क्षमतेची पॉवर बँक दहा तासात चार्ज होते. सर्वात जलद चार्ज होणारी पॉवर बॅंक सहा तासांपेक्षा कमी वेळात चार्ज होत नाही. परंतू आता एक भन्नाट पॉवर बॅंक बाजारात आली आहे. हॉंगकॉंगची कंपनी युकूमा (Yukuma)ने १००० mAh क्षमतेची पावर बॅंक बाजारात आणली आहे. ही पावर बॅंक केवळ अर्ध्या तासात म्हणजेच ३० मिनिटात पूर्ण चार्ज होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पॉवर बॅंक्सच्या तुलनेत ही पॉवर बॅंक १० पटीने जलद आहे. १५ मिनिटात ५० टक्के आणि २५ मिनिटात ७५ टक्के ही पॉवर बॅंक चार्ज होते असं कंपनीनं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या पॉवर बॅंकचा उपयोग केवळ मोबाइल चार्ज करण्यासाठी होत नाही तर, याच्या मदतीनं टॅबलेट, MP3 प्लेयर, डिजिटल कॅमरा, GPS डिव्हाइज, पोर्टेबल गेमिंग सिस्टम, ब्लूटूथ स्पीकर ही उपकरणंही चार्ज करता येणार आहेत. या पॉवर बँकमध्ये नऊ संरक्षीत थर देण्यात आले आहेत. याच LED इंडीकेटरही देण्यात आला आहे. तसचं ही पॉवर बँक चार्ज करण्यासाठी दोन USB पोर्टची सुविधा आहे. म्हणजे एका वेळी दोन उपकरणं या पावर बॅंकेच्या साहाय्याने चार्ज करता येतील. चांगल्या दर्जाचा मेटल केस तसंच वजनाने हलकी अशी ही पॉवर बँक आहे. काळ्या, राखाडी आणि सोनेरी अशा तीन रंगाचा पर्याय देण्यात आला आला असून या पॉवर बँकची बाजारात ११९ डॉलर्स म्हणजेच ८,२०० रुपये इतकी आहे. सध्या ही पॉवर बँक ऐमजॉन यूएस स्टोरवर १,९०० रुपयांना उपलब्ध आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2K6BYjU

Comments

clue frame