आता फोनशिवायही डेस्कटॉपवर चालणार व्हॉट्सअॅप!

मुंबई : मेसेजिंग प्लॅटफॉर्म्समध्ये अव्वल असणाऱ्या व्हॉट्सअॅपच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये काही सुधारणा होणार आहेत. त्यामुळे लवकरच यूजर्सला मोबाईलवर इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसतानाही यूजर्सला डेक्सटॉपवर व्हॉट्सअॅप वापरता येणं शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅपचं डेक्सटॉप व्हर्जन २०१५ साली लॉन्च करण्यात आलं होतं. मोबाईलवरील क्यू-आर कोड स्कॅन केल्यावर लॅपटॉप, कंप्युटर अशा डेक्सटॉपवरही व्हॉट्सअॅप वापरता येतं. पण त्यासाठी मोबाईलवर इंटरनेट चालू असण्याची गरज असते. पण आता इंटरनेट शिवायही डेक्सटॉपवर व्हॉट्सअॅप चालू शकेल. 'डब्लूएबीटाइन्फो' या व्हॉट्सअॅपबद्दलच्या सर्व घडामोडींची माहिती देणारी वेबसाइटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप एक '' (यूडब्ल्यूपी) अॅप बनवण्याचे प्रयत्न करत आहे. याबरोबर 'मल्टिप्लॅटफॉर्म सिस्टिम' विकसीत करण्याचं कामंही चालू राहील. यामुळे फोन बंद असतानाही डेक्सटॉप व्हर्जनमध्ये मोबाईलवर इंटरनेट नसल्यावरही अकाउंट हाताळणं शक्य होईल. विशेष म्हणजे,' मल्टिप्लॅटफॉर्म सिस्टिम'मुळे एकाच नंबर वरून अनेक डीव्हायसेसवर व्हॉट्सअॅप सूरू करता येईल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GC0I2u

Comments

clue frame