मुंबई: ऑनलाइन डेटिंग ॲप 'टिंडर'ने समलैंगिक (एलजीबीटीक्यूआय) समुदायातील युजर्ससाठी एक नवीन सेफ्टी फीचर लॉन्च करण्याची घोषणा गुरूवारी केली. या सेफ्टी फीचरचा उद्देश एलजीबीटीक्यूआय समुदायातील युजर्ससाठी डेटिंग सुरक्षीत व्हावी असा आहे, असं 'टिंडर'ने म्हटलं आहे. या फीॲचरला 'ट्रॅव्हलर अलर्ट' असं नाव देण्यात आलं आहे. एखादा समलैंगिक समुदायातील युजर दुसऱ्या देशातील व्यक्तीला डेट करू इच्छूक असेल तर, त्या देशातील समलैंगिक समुदायाची स्थिती काय आहे. त्यांच्या अडचणी काय आहेत. ते कोणत्या आव्हानांना तोंड देतायत या सर्वाची माहिती 'ट्रॅव्हलर अलर्ट'द्वारे मिळणार आहे. 'अनेक देशात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. समलैंगिक संबंध आजही मनमोकळेपणाने स्वीकारले जात नाहीत. त्यामुळं परदेशातील व्यक्तीला डेट करताना तिथल्या कायद्याची माहिती असावी. युजर्स सावधान व्हावे' यासाठी हे फीचर आम्ही घेऊन आलो आहोत असं 'टिंडर'च्या सरव्यवस्थापक 'तारू कपूर' यांनी सांगितलं आहे. हे फीचर ॲन्ड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZgktUI
Comments
Post a Comment