जबराट! ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याने घेतलेला फोटो

मुंबई मोबाइल तंत्रज्ञान विकसित होत असताना मोबाइल कंपन्यांमधील स्पर्धाही तीव्र होत आहे. आता ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यानंतर मोबाइल कंपन्यांचे लक्ष ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याकडे लागले आहे. चीनमधील फोन कंपनी रेडमीने ६४ मेगापिक्सल कॅमेरा फोनचा टीजर लाँच केला. यामध्ये या ६४ मेगापिक्सलने काढलेला फोटो दाखवण्यात आला आहे. रेडमी आज सकाळी आपल्या फोनमधील कॅमेऱ्याचा टीझर आपल्या वीबो अकाउंटवरून शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये मांजरीच्या डोळ्याला झूम करून दाखवण्यात आले आहे. यातून या कॅमेऱ्यातून फोटो किती स्पष्ट येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शाओमीच्या चाहत्यांना हा टीझर खूपच आवडला आहे. मात्र, कंपनीने आगामी ६४ मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोनचा कोणताही फोटो शेअर केला नाही. रेडमीच्या या ६४ मेगापिक्सलचा कॅमेऱ्यामुळे या मोबाइलची वेगळी ओळख बाजारपेठेत निर्माण होणार असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे सॅमसंग आणि रिअलमी मोबाइल कंपनीदेखील ६४ मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. इतंकच नव्हे तर रिअलमीचे सीईओ माधव सेठ यांनी मागील महिन्यात आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन रिअलमीने ६४ मेगापिक्सल कॅमेरा फोनने घेतलेला फोटो शेअर केला होता. सॅमसंग आणि रिअलमीच्याही आधी रेडमी आपला ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा लाँच करून स्पर्धेत पुढे जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GqWiM2

Comments

clue frame