फेसबूकवर आता तंबाखू, सिगारेटला बंदी!

मुंबई : आणि त्याच्याशी संलग्न असलेला फोटो शेअरींग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम या दोन्हीवर एक नवं धोरण राबवायचं ठरवलं आहे. आणि मद्य पदार्थांवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने बंदी घातली असून त्याबाबतीला काही मजकूर आता फेसबूक, इंस्टाग्रामवर दाखवला जाणार नाही. एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार तंबाखू आणि मादक पदार्थांच्या खासगी हस्तांतरण, देवाणघेवाण आणि विक्रीवर फेसबूक, इंस्टाग्रामने पुर्णतः बंदी आणल्याचे समजते. असे करायचे असल्यास पोस्ट करताना पोस्ट सदृश्यतेसाठी कमीतकमी १८ वर्ष इतकी वयोमर्यादा घालावी लागेल असा नियमही करण्यात आला आहे. याशिवाय कोणीही तंबाखू आणि व्हेप उत्पादनांबाबत कोणतीही पोस्ट विनाअट शेअर करण्याची परवानगी यूजर्सला असेल. या नियमाचे उल्लघंन केलेल्या अकाउंटची इतर अकाउंट्सने 'रिपोर्ट'च्या माध्यमातून तक्रार केली तर फेसबूक स्वत: असे अकाउंट बंद करून टाकेल. यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच अशी अकाउंट्स शोधण्यासाठी विशिष्ट कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात येईल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MbUcmS

Comments

clue frame