मुंबई: जपानची प्रसिद्ध कंपनी 'सोनी'नं एक खास एअर कंडीशनर (AC)उपकरण बाजारात आणलं आहे. 'रिऑन पॉकेट' () असं या उपकरणाचं नाव असून हा एसी इतका छोटा आहे की, परिधान केलेल्या कपड्यावर सहज बसवता येणार आहे. त्यामुळं आता उकाड्याची चिंता करणं सोडून द्या. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे थंडीच्या दिवसात या एसीच्या मदतीनं तुम्हाला गरम हवा मिळू शकते . या एअर कंडीशनरला मोबाइलद्वारे कंट्रोल करता येणार असून वापरण्याठी हे अगदी सोप्प आहे. सोनीने या एयर कंडीशनरला क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलं आहे. पाठीवर सहज लावता येईल असं हे उपकरण असून सध्यातरी हे उपकरण केवळ पुरुषांसाठी उपलब्ध आहे. या उपकरणाचं तापमान मोबाईलमधील अॅपच्या साहाय्यानं कमी जास्त करता येणार आहे. एका विशिष्ट एसी पेल्टियर घटकापासून हे उपकरण तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळं हे उपकरण लगेच थंड आणि गरम होण्यास मदत होते. या घटकाचा वापर कार किंवा कूलर्समध्ये केला जातो. या स्मार्ट उपकरणांत लिथियम ऑयन बॅटरीचा वापर करण्यात आला असून २ तास चार्ज केल्यानंतर दिवसभर याचा वापर करण्यात येणार आहे. हा छोटा एसी ब्लूटूथ ५.० LE कनेक्टेड फोनला सपोर्ट करतो.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2K5K2kP
Comments
Post a Comment