२ जीबी रॅम असलेल्या फोनवरही खेळू शकणार पबजी

मुंबईः पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या देशभरात प्रचंड वाढत आहे. या मारधाडवाल्या गेमनं सध्या धुमाकूळ घातला आहे. हा गेम खेळण्यासाठी सगळ्यात गरजेचं आहे ते हाय स्पेसिफिकेशन असलेला स्मार्टफोन. अडथळ्यांशिवाय पबजी गेम खेळण्यासाठी स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर आणि हार्डवेअर असणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच २ जीबीपेक्षा कमी रॅम असणारे युजर्सना गेम खेळताना अडथळा येतो. यासाठीच कंपनीनं '' हा नवा पर्याय उपलब्ध केला आहे. आता २ पेक्षा कमी रॅम असणारे युजर्सही पबजी खेळू शकणार आहेत. पबजी लाइटमध्ये ही अनरिअल इंजिन ४चा वापर केला आहे. कमी रॅम असलेल्या डिव्हाइसवरही उत्तमरित्या खेळता यावं यासाठी कंपनीनं हा पर्याय उपलब्ध केला आहे. कमी स्टोरेज 'पबजी लाइट'साठी अधिक स्टोरेजची आवश्यकता नाहीये. मेन पबजीच्या तुलनेनं एक चतुर्थांश भाग 'पबजी लाइट'साठी लागणार आहे. 'पबजी लाइट' फक्त ४०० एमबीचा आहे. तसंच,या पबजीच्या या व्हर्जनमध्ये ६० खेळाडुंच्या बरोबरीनं नकाशा छोटा करण्यात आला आहे. मेन पबजीच्या नकाशात १०० खेळाडु असतात. याचबरोबर, एका राउंडसाठीचा वेळ १० मिनिटं कमी करण्यात आला आहे. एम असिस्ट अपडेट टार्गेटवर हल्ला करण्यासाठी कंपनीनं 'पबजी लाइट'मध्ये 'एम असिस्ट'ची क्षमता वाढवली आहे. गेममध्ये फास्ट बुलेट, नो बुलेट ड्रॉप आणि दुश्मनांचा खात्मा करण्यासाठी 'अॅड ऑन' फिचर दिलं आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y6Z4Re

Comments

clue frame