पबजीच्या वेडापायी पाच मुलं घरातून पळाली!

देहरादून: जगभरात पबजी गेमनं तरुणांना वेड लावलं आहे. पबजी गेम खेळताना कशाचंही भान राहत नसल्याचं समोर आलं असून आई- वडिलांनी पबजी खेळण्यास मनाई केल्यानं ११ ते १५ वर्ष वयोगटातील पाच शाळकरी मुलांनी घरातून पळ काढत थेट दिल्ली गाठल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या प्रयत्नांमुळं या मुलांची घरवापसी करण्यात आली आहे. पबजीसाठी घरातून पळालेल्या या पाच मुलांपैकी एक दहावीचा तर बाकीचे इयत्ता सातवी विद्यार्थी होते. देहरादून शहरातील राजपूर पोलिस स्थानकात ११ ते २२ जुलैच्या दरम्यान घरातून पळून गेलेल्या मुलांच्या पालकांनी मुलं हरवल्याच्या तक्रारी दाखल केल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघकीस आला. पाचही तक्रारींमध्ये साम्य दिसून आल्यानं पोलिसांनी पालकांची चौकशी केली. चौकशीअंती पालकांनी मुलांना 'पबजी' आणि 'फ्री फायर' हे गेम खेळण्यास मनाई केली होती, असं समोर आलं. पालकांनी नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडं चौकशी केली. मात्र कुठेच त्यांचा पत्ता लागत नसल्यानं त्यांनी अखेर पोलिसांची मदत घेतली. अखेर तीन पोलिस अधिकाऱ्यांची टीम दिल्लीत पोहचली. या मुलांनी दिल्लीतील नातेवाईकांना संपर्क करण्याचा पयत्न केला आणि त्यामुळं या मुलांना ट्रॅक करून शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. दोन मुलांना दिल्ली -गाझियाबादच्या सीमेवरून एका हॉटेलमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्नात असताना तर, तिघांना हजरत नवाजुद्दीन रेल्वे स्टेशनइथून ताब्यात घेतलं.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30SBzbB

Comments

clue frame