इन्स्टाग्राममध्ये बग शोधला; २० लाख मिळाले

मुंबई इन्स्टाग्रामने चेन्नईतील लक्ष्मण मुथय्याला २० लाखाचे बक्षिस दिले आहे. इन्स्टाग्राममध्ये बग शोधण्यासाठी फेसबुकने बाउंटी प्रोग्राम अंतर्गत लक्ष्मण मुथय्याला बक्षिस दिले आहे. इन्स्टाग्राममधील या बगमुळे कोणत्याही अकाउंटला हॅक करणे शक्य होते. पासवर्ड रिसेट, रिकव्हरी कोडद्वारे कोणतेही अकाउंट हॅक करणे सोपं असल्याचे लक्ष्मणने सांगितले. इन्स्टाग्राममध्ये असणाऱ्या या बगबद्दल माहिती दिल्यानंतर फेसबुकची सिक्युरीटी टीम यावर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे लक्ष्मणने सांगितले. त्यानंतर काही माहितीचे आदान प्रदान व कॉन्सेप्ट व्हिडिओ दिला. व्हिडिओच्या माध्यामातून फेसबुकच्या टीमला इन्स्टाग्राममधील बगची माहिती देण्यास यशस्वी ठरलो असल्याचे त्याने सांगितले. अखेर फेसबुक व इन्स्टाग्रामच्या टीमने या समस्येवर मात केली असल्याचे त्याने नमूद केले. याआधी फेसबुकच्या डेटा डिलीशन आणि डेटा डिस्क्लोजर या बगचा शोधही लक्ष्मणने घेतला होता. डेटा डिलीशन बगमुळे कोणत्याही युजर्सचा पासवर्ड न जाणून घेताही सर्व फोटो डिलीट करता येत होते. तर, दुसरा बग हा फोनमध्ये अन्य अॅप डाउनलोड करण्याची सूचना देत होता. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर बग युजर्सच्या अकाउंटमध्ये जाऊन सर्व फोटो अॅक्सेस करू शकत होता. हे बगदेखील लक्ष्मणने फेसबुकच्या बाउंटी कार्यक्रमातंर्गत शोधले होते. युजर्सपर्यंत हे बग पोहचण्याआधी फेसबुक यावर काम केले होते. त्यामुळे युजर्सना याबाबत माहिती झाली नव्हती.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30D7Raz

Comments

clue frame