भारतीय हवाई दलाचा नवीन ऑनलाईन गेम

मुंबई : स्मार्टफोन्सवर गेम खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दालाने एक नवा ऑनलाइन गेम काढला असून हा गेम खेळणताना यूजर्सना फायटर विमान आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव मिळेल. हवाई दलाकडून तयार करण्यात आलेला हा खेळ पबजीप्रमाणे ऑनलाइन खेळता येईल. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर हा गेम उपलब्ध असेल. या महिन्याच्या ३१ तारखेला गेम सर्वत्र लॉन्च होईल. गेम मल्टीप्लेअर असला तरी सुरूवातीला सिंगल प्लेअर व्हर्जनमध्ये लॉन्च केला जाणार आहे. गेम खेळताना प्लेअर्सला वैमानिकासारखा व्हर्चुअल अनुभव मिळेल. हवाई दलाना या गेमचा टिझर सोशल मिडीयावर शेअर केला आहे. टिझर पाहून हा गेम किती रोमांचकारी असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. वेगवेगळी मिशन्स पूर्ण करण्याचं आव्हान प्लेअर्स समोर असेल. गेममध्ये फायटर जेट आणि हेलिकॉप्टर उडवत शत्रुंना मारण्यासोबतच त्यांचे बेस कँप्स आणि विमानं बरखास्त करायची आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JKMGOf

Comments

clue frame