'या' आयफोनवर मिळतोय जबराट डिस्काउंट

मुंबई अॅपलच्या आयफोन ८ प्लस, आयफोन एक्स या या फोनवर सध्या मोठी सवलत मिळत आहे. ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर आयफोन ८ प्लसवर तब्बल १५ हजारांहून अधिक रुपयांची सवलत मिळत आहे. ही ऑफर स्टॉक असेपर्यंत असणार आहे. आयफोन ८ प्लस हा फोन सप्टेंबर २०१७ मध्ये लाँच करण्यात आला होता. ३ जीबी रॅम व ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या या मोबाइलची बॅटरी क्षमता २६९१ एमएएच इतकी आहे. तर, कॅमेरा १२+१२ मेगापिक्सलचा आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये ७ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. अॅमेझॉनवर आयफोन ८ प्लस (रेड, ६४जीबी) या फोनवर २५ टक्के म्हणजेच १९ हजार ५६१ रुपयांची सवलत असून हा फोन ५७ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. आयफोन ८ प्लस (स्पेस ग्रे, ६४ जीबी) या फोनवर १६ हजार ६१ रुपयांची सवलत असून हा फोन ६१ हजार ४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या आयफोन ८ प्लसवर २५ हजार ७५१ रुपयांची सवलत असून हा ६२ हजार ९९९ रुपयांना हा फोन खरेदी करता येणार आहे. आयफोन एक्सवर ही सवलत देण्यात आली आहे. आयफोन एक्सवर २३ हजार ४०१ रुपयांची सवलत असून हा फोन ६८ हजार ४९९ रुपयांना खरेदी करता येणार. अॅमेझॉनवर ही ऑफर मर्यादित काळापर्यंत असणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2y84Dj4

Comments

clue frame