नोकियाच्या 'या' फोनची बॅटरी चालणार महिनाभर!

मुंबई : या कंपनीने आज दोन नवीन फीचर फोन्सची घोषणा केली आहे. नोकिया २२० ४जी आणि नोकिया १०५ अशी या मॉडेल्सची नावे असून दोन्ही फोनची बॅटरी साधारण २५ ते २७ दिवसांपर्यंत टिकू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. नोकिया २२० ४जी आणि नोकिया १०५ ही दोन्ही मॉडेल्स पूर्वी लॉन्च केलेल्या मॉडेल्सचं अपडेटेड व्हर्जन असणार आहे. या नव्या मॉडेल्समध्ये कंपनीने काही नवे व आकर्षक फिचर्स उपलब्ध करून दिले आहेत. या दोन्ही फोनच्या किमतीचा तपशील मात्र उपलब्ध झालेला नाही. नोकिया २२० ४ जी स्पेसिफिकेशन्स हा फोन ओएस प्रणालीवर चालेल. फोनमध्ये मायक्रो यूएसबी पोर्टद्वारे चार्ज होणारी १२०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. बॅटरी पूर्ण चार्ज झालेली असेल तर सलग ६.३ तास फोनवर बोलता येणं शक्य आहे. बॅटरी पूर्ण चार्ज झालेली आहे आणि फोनचा वापर केला नाही तर २७ दिवसांपर्यंत बॅटरी तशीच चार्ज राहू शकते. फोनमधील आणखी काही खास फीचर्स - २.४ इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले - १६ एमबी रॅम सोबत २४ एमबी स्टोरेज - एलईडी फ्लॅश आणि व्हिजीए कॅमेरा - एमपी ३ प्लेअर आणि इअरफोन शिवाय चालणारा एफएम रेडियो - ३.५ एमएम ऑडिओ जॅक - काळ्या व निळ्या रंगात उपलब्ध नोकिया १०५ जी स्पेसिफिकेशन्स नोकिया १०५ चं हे फोर्थ जनरेशन मॉडेल आहे. जुन्या फोनपेक्षा हा फोन आकाराने थोडा मोठा असेल. ८०० एमएएच क्षमतेच्या बॅटरीचा स्टँडबाय टाइम २५.८ दिवसांचा असून फोन पूर्ण चार्ज केल्यावर सलग १४.४ तास फोनवर बोलता येऊ शकतं. 'हे' आहेत खास फीचर्स - १.७७ इंचाचा क्यूक्यूव्हीजीए डिस्प्ले - ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेज - २००० कॉन्टॅक्ट नंबर आणि ५०० मेसेजेस स्टोअर करण्याची क्षमता - नोकिया सीरिज ३० + सॉफ्टवेअर - ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि फ्लॅशलाइट - निळा, गुलाबी व काळा या रंगात उपलब्ध


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32N5BiS

Comments

clue frame