दिल्ली: ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेला व्हिव्होचा 'झेड फाइव्ह' हा फोन लॉंच झाला आहे. डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, स्नॅपड्रॅगन ७१२ चिपसेट आणि ४८ मेगापिक्सेलचा कॅमरा ही या फोनची वैशिष्ट्यं आहेत. या फोनमध्ये हाय ग्लास पॉलिकार्बोनेट चेचिज देण्यात आला आहे. या फोनचं रिझोल्युशन १०८०*२३४० पिक्सेलचं आहे. तर ६.३९ इंचांचा फुल एचडी आणि अॅमोलेड डिस्प्लेही या फोनमध्ये उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी ४५०० एमएचची असून ऑक्टा कोर प्रोसेसर २.३ गिगा हर्टझचा आहे. या फोनचा आस्पेक्ट रेशो १९:५:९ चा आहे. या फोनमध्ये ९०% स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. तसंच 'फोन ऑलवेज ऑन डिस्प्ले', 'डीसी डिमींग' सारखे फीचर्सही या फोनमध्ये देण्यात आले आहेत. ट्रिपल कॅमेरा सेटअप या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७१२ चिपसेट देण्यात आला आहे. ज्यासोबत ६ आणि ८ जीबीचा रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये २५६ जीबी युएसएफ आहे तर २.१ स्टोरेज आहे. ४,५०० एमएएचची बॅटरी, २२.५ वॅटचा फ्लॅश चार्जचा सपोर्टही या फोनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये २५६जीबी युएसएफ स्टोरेजही देण्यात आलं आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेलचा कॅमेराही देण्यात आला आहे. किंमत या फोनच्या ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिअंटची किंमत १६,००० रुपये आहे. तसंच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हॅरिअंटची किंमत १९००० रुपये आहे तर ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीची किंमत २०,००० रुपये आहे. हा फोन ८ जीबी रॅमसोबतही उपलब्ध असून त्याची किंमत २३,००० रुपये आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YE11nG
Comments
Post a Comment