: आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक उपकरणं स्मार्ट झाले आहेत. फिटनेस ब्रॅंड ते स्मार्ट टिव्हीनंतर आता स्मार्ट डायपर्सही बाजारात उपलब्ध झाले आहे. लहान मुलांचे डायपर्स बनवणारी पॅम्पर्स कंपनी लवकरच हे नवे स्मार्ट डायपर घेऊन येणार आहे. हे डायपर 'कनेक्टेड केयर सिस्टम'बरोबर असणार आहे. ही सिस्टम लूमी या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच हे डायपर्स लहान मुलांची हालचाल ट्रॅक करणार आहे. डायपर ओलं झाल्यावर सेंसरच्या मदतीने सूचना मिळणार आहे. स्मार्ट डायपर लहान मुलांच्या झोपावायच्या आणि जाग करण्याचा वेळा या अॅपवर पाहायला मिळणार आहे. या सिस्टमवर एक व्हिडिओ मॉनीटरचाही सामावेश असून, तो थेट अॅपशी जोडलेला असणार आहे. हा पॅम्पर्स 'यूएस'मध्ये लॉंच होणार असून, याची अधिकृत किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही. कंपनीने या प्रॉडक्टची गुरुवारी घोषणा केली आहे. लवकरच कंपनी या प्रॉडक्टला लॉंच करणार आहे. अनेक नवे उपकरणं बाजारात उपलब्ध इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे पुढील काही वर्षात अनेक नवे उपकरणं बाजारात उपलब्ध होणार आहे. तर काही कंपनीने या दिशेकडे पावलंही टाकण्यास सुरुवात केली असून, स्मार्ट नाइट लाइट्स ,लहान मुलांची भूक ओळखणारी बॉटल आणि पालकांचा आवाज काढणारा अॅपही लॉंच केले जात आहे. तज्ञांनी व्यक्त केली चिंता तज्ञांच्या मते, लहान मुलांना अतिप्रमाणात तंत्रज्ञानाच्या सहवासात आणणे हे नुकसानकारक असल्याचे तज्ञांनी सांगितले. पालकांनी अशी उपकरणं वापरण्याआधी विचार केला पाहिजे, असे मत लेखिका लिथकॉट हाइम्स यांनी मांडले आहे. यामुळे पॅम्पर्स कंपनीने पहिल्यांदा एक नव उपकरणं बाजारात आणलं असून, प्रथम त्यांना आता पालकांचा विश्वास जिंकावा लागणार आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Gom5nM
Comments
Post a Comment