रिअलमी एक्स आज सेल; जाणून घ्या ऑफर आणि वैशिष्ट्ये

मुंबई 'ओप्पो'ची सबब्रॅण्ड स्मार्टफोन कंपनी हा फोन लाँच झाला आहे. भारतात या फोनचा आज पहिला सेल असून दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट, रिअलमीच्या वेबसाइटवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये पॉपअप कॅमेरा, जबरदस्त डिस्प्ले, कॅमेरा आहे. फोनची किंमत व ऑफर रिअलमी एक्सच्या ४ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवरुन हा फोन एसबीआय क्रेडिट कार्ड खरेदी केल्यास १० टक्के सवलत मिळणार आहे. तर, अॅक्सिस बँकेचा वापर केल्यास ५ टक्क्यांची सवलत आहे. हा फोन नो कॉस्ट इएमआयवरही खरेदी करता येऊ शकतो. इएमआयची सुरुवात प्रति महिना २८३४ रुपयांपासून सुरू आहे. फोनची वैशिष्ट्ये फोनमध्ये ६.५३ इंचाचा एफएडी+ नॉचलेस सुपर एमोल्ड डिस्प्ले आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ ने फोन प्रोटेक्टेड आहे. रिअलमी एक्समध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. यामध्ये सोनी आयएमएक्स५८६ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये सोनी आयएमएक्स ४७१ सेंसरसह १६ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१०एआयई प्रोसेसर आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y1SeMX

Comments

clue frame