फेसबुकला दणका, ३४ हजार कोटींचा दंड

नवी दिल्ली: प्रायव्हसी ब्रीच आणि स्कँडलच्या सेटलमेंटसाठी फेसबुकला ३४ हजार कोटींचा ठोठावण्यात आला आहे. फेसबुकनेही हा दंड भरण्यास होकार दर्शविला आहे. हा आजवरचा सर्वात मोठा दंड मानला जात आहे. फेडरल ट्रेड कमिशनने हा निर्णय दिला. कमिशनने फेसबुकवर कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय यूजर्सशी खोटं बोलणं, प्रायव्हसीशी तडजोड करणं आणि सेक्युरिटीसाठी यूजर्सनी दिलेल्या नंबरवर जाहिरात देणे आदी आरोप फेसबुकवर ठेवण्यात आले होते. फेशियल रिकॉग्निशनबाबतही फेसबुककडून यूजर्सशी खोटं बोलण्यात आलं. विशेष म्हणजे फेशियल रिकॉग्निशन बाय डिफॉल्ट ऑफ नव्हतं, असा आरोपही फेसबुकवर ठेवण्यात आला आहे. या कमिशनने फेसबुकला केवळ दंड ठोठावला नाही तर अनेक गोष्टीही सांगितल्या आहेत. त्याचबरोबर फेसबुकला काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नव्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिससाठी प्रायव्हेसी रिव्ह्यू करणे आणि दर तीन महिन्याला सीईओ आणि त्रयस्थ पक्षकाराला या रिव्ह्यूचा एसेसर देणं फेसबुकला बंधनकारक केलं आहे. काय आहे प्रकरण? केंब्रिज अॅनालिटिका या संस्थेने फेसबुकवरील यूजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता. तेव्हा फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने जाहीर माफीही मागितली होती. त्यानंतर काही हॅकर्सने फेसबुकच्या view as सेंटिगचा गैरवापर करून ३ कोटी युजर्सचा डेटा चोरला होता. यातील दीड कोटी युजर्सची नाव, पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरीला गेली होती. तर १ कोटी चाळीस लाख यूजर्सची प्रोफाइलवरची बरीच गोपनीय माहितीही चोरीला गेली होती. या तीन कारणांमुळे दंड आकारला >> केंब्रिज अॅनालिटिका डाटा ब्रीच >> फेशियल रिकॉग्निशन बाय डिफॉल्ट ऑफ असल्याची खोटी माहिती दिली >> सिक्युरिटीसाठी यूजर्सकडून नंबर घेतले आणि त्यावर जाहिराती दिल्या


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LH3p71

Comments

clue frame