सॅमसंगचा फोल्डेबल फोन पुढील महिन्यात?

मुंबई : सॅमसंगचा बहुचर्चित '' हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत बाजारात येणार आहे. जून महिन्यात हा फोन बाजारात आणण्याची घोषणा कंपनीनं केली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचं लाँचिंग लांबणीवर पडलं. हे तांत्रिक अडथळे आता दूर झाले असल्याचं बोललं जात आहे. सॅमसंगचा लॉन्चसाठी पूर्णतः तयार होता. मात्र, फोन फोल्ड करताना स्क्रिन तुटू लागल्याने लॉन्चिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या तांत्रिक त्रुटीवर तातडीनं काम सुरू करण्यात आलं असून ऑगस्ट महिन्याच्या ७ तारखेपर्यंत फोन बाजारात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. व्हर्टिकल फोल्ड सॅमसंगने ज्या फोल्डेबल फोनची वर्षाच्या सुरुवातीला घोषणा केली होती, त्या फोनला आडवी घडी पडत होती. त्यामुळे फोन एखाद्या पुस्तकासारखा दिसत असे. मात्र, आता या फोनला उभी घडी पडत असल्याचे समोर आले आहे. फोनची वैशिष्ट्ये 'गॅलेक्सी फोल्ड' बाबत अधिक माहिती समोर आलेली नसली तरी या फोनला ६.७ इंचाचा डिस्प्ले असेल, असे समजते. ऑक्टा कोर परफॉर्मन्ससह १२ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोरेज, ४३८० एमएएच बॅटरी क्षमता व ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OblVqy

Comments

clue frame