ट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल

मुंबई : ट्विटरने आपल्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये एक नवीन अपडेट आणलंय. या नव्या अपडेटने ट्विटरचा लूक पुर्णपणे बदलला असून मोबाईल अॅपमधले अनेक फिचर्स डेक्सटॉप व्हर्जनमध्ये उपलब्ध झाले आहेत. नेटकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. ट्विटरवर अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असतात. या माध्यमातून क्षणोक्षणीचे अपडेट्स युजर्सला मिळत असतात. ट्विटरच्या या नव्या अपडेटमध्ये 'कस्टमायझेशन ऑप्शन्स' वाढवण्यात आलेत. शिवाय, ट्विटरवर नेव्हिगेशन सेटिंग्स बदलल्यामुळे त्याचा लुक बदलल्याचं समजतं. लवकरच हे अपडेट सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केलं जाईल. 'नेव्हिगेशन बार'ची जागा बदलली ट्विटरचा नवा लूक पाहिल्यावर लगेचच ट्विटरमधील नेव्हिगेशन बारची जागा बदलल्याचं समजतं. जुन्या व्हर्जनमध्ये उजवीकडे वरच्या बाजूला असलेला नेव्हिगेशन बार डाव्या बाजुला एका सरळ रेषेत दिसतो. या बारमध्ये बुकमार्क्स, लिस्ट, प्रोफाइल आणि एक्सप्लोर असे अनेक टॅब दिसतात. यातील एक्सप्लोर टॅब मोबाईल व्हर्जनमधून घेण्यात आला आहे. या टॅबमुळे यूजरला लाइव्ह व्हिडिओसोबतच लोकल ट्रेंड पाहाता येतील. याशिवाय, लेटेस्ट ट्विट्स दाखवणारं 'स्पार्कल' हे फिचरसुद्धा मोबाईल अॅपमधून घेतले आहे. नव्या अपडेटमध्ये इमोजी बटनने ट्विटमध्ये फोटो, जीआयएफ किंवा पोल सुद्धा ट्विट करता येईल. मेसेज फिचर ट्विटरद्वारे एखाद्या व्यक्तीसोबत केलेलं संभाषण आणि त्याला पाठवायचा मेसेज हे दोन्ही आता एकाच विंडोमध्ये दिसेल. वेगवेगळ्या कलर थीम्स आणि स्किम्ससोबत डार्क मोडचं नवं फिचरही ट्विटरने उपलब्ध केलं आहे. अकाउंट स्विच करणं झालं सोपं ट्विटरवर एकापेक्षा जास्त अकाउंट्स हाताळणाऱ्यांसाठी हे अॅप वरदान ठरेल. नेव्हिगेशन बारमधल्या नव्या फिचरमुळे झटकन एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटवर जाता येईल.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2lepduJ

Comments

clue frame