मुंबई स्मार्टफोनमुळे जीव गमावण्याच्या घटना समोर येतात. मात्र, दोन वर्ष जुना असणाऱ्या स्मार्टफोनमुळे २० लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले. बोटीतून प्रवास करत असताना अचानक बोट उलटली. जवळपास सर्वच लोकांचे फोन पाण्यात बुडाल्याने बंद पडले. मात्र, एका व्यक्तीचा दोन वर्ष जुना असणारा फोन सुरू होता. त्याच्या आधारे बचाव पथकाला त्यांची सुटका करण्यात यश मिळाले. फिलीपाइन्समधील ही घटना आहे. एका बोटीतून १६ परदेशी आणि ४ स्थानिक लोक एका बेटावर जात होते. त्याच दरम्यान त्यांची बोट उलटली. त्यावेळी मदतीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. अनेकांचे मोबाइलही बंद झाले. मात्र, कॅनडाचा नागरिक असणाऱ्या जिम इम्डी यांचा सॅमसंग सुरू होता. या फोनमध्ये आयपी६८ वॉटर रेसिस्टेंट आहे. त्यामुळे फोन पाण्यात भिजल्यानंतरही काम सुरू होता. या फोनद्वारे लोकांनी मदत मागितली. बुडालेल्या प्रवाशांनी आपले जीपीएस लोकेशन बचाव दलाला पाठवले. अखेर बचाव दलाने या प्रवाशांची सुटका केली. पाण्यात भिजल्यानंतरही फोन सुरू राहिला. खरंतर माझ्या अपेक्षेहून अधिक काळ फोन सुरू राहिला असल्याची प्रतिक्रिया जिम इम्डी यांनी दिली. याआधीदेखील जपानमधील ओकिनावा किनाऱ्यावर आयफोनमुळे आठजणांचे प्राण वाचले होते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SwBabU
Comments
Post a Comment