'रेडमी ७ ए'चा आज सेल; जिओकडून कॅशबॅकची ऑफर

मुंबई शाओमी ची आज पुन्हा एकदा विक्री होणार आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट, एमआय डॉट कॉम आणि शाओमीच्या होम स्टोर्सवर फोनची विक्री होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच रेडमी ७ ए ची लाँच करण्यात आला होता. आजच्या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर मिळणार आहेत. शाओमीने रेडमी ७ए मोबाइल बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. १६ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत ५,९९९ रुपये आहे. तर, ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजची किंमत ६,१९९ रुपये आहे. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर कंपनीकडून २०० रुपयांची सवलत आहे. त्याच वेळेस फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना रिलायन्स जिओच्यावतीने २२०० रुपयांच्या कॅशबॅकसह १२५ जीबी डेटा मिळणार आहे. जिओकडून मिळणारा कॅशबॅक ५० रुपयांच्या ४४ डिस्काउंट व्हाउचरच्या रुपात मिळणार आहे. हे व्हाउचर माय जिओ अॅपमध्ये क्रेडिट होतील. या व्हाउचरचा फायदा मिळवण्यासाठी जिओला १९८ रुपयांचा किंवा २९९ रुपयांचा प्लान रिचार्ज करावा लागणार आहे. असा आहे रेडमी ७ ए फोनमध्ये २ जीबीचा रॅम असून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर आहे. फोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सोनी आयएमएक्स४८६ सेंसरसह १२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोन १६ जीबी व ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध असून मायक्रो एसडी कार्डद्वारे २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोनची बॅटरी क्षमता ४००० एमएएच इतकी आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z8IdKi

Comments

clue frame