नोकियाच्या या फोनमध्ये मिळणार सहा कॅमेरे आणि ५ जी टेक्नलॉजी

नवी दिल्लीः एचएमडी ग्लोबल या कंपनीनं काही दिवसांपूर्वी सहा कॅमेरा असलेला ' ९ प्युअरव्ह्यू' स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनी हा फोन अपग्रेड करण्याच्या विचारात आहे. लवकरच 'नोकिया ९.१ प्युअरव्ह्यू' स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनचं वैशिष्ट्ये म्हणजे फोनमध्ये ६ कॅमेऱ्यांबरोबरच ५जी टेक्नलॉजी सपोर्ट देण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा स्मार्टफोन बाजारात येणार आहे. 'नोकिया ९.१ प्युअरव्ह्यू' या दमदार स्मार्टफोनमध्ये ५ जी तंत्रज्ञान फिचर देण्याचा विचार कंपनी करत आहे. यासाठीच कंपनी ५ जी टेक्नलॉजीला सपोर्ट करणाऱ्या क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ चिपसेटचा वापर करणार आहे. 'नोकिया ९ प्युअरव्ह्यू' स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरसोबत लाँच केला होता. 'नोकिया ९ प्युअरव्हू'मध्ये स्लो कॅमेरासारख्या अडचणी युजर्सना येत होत्या. एचएमटीच्या या नवीन डिव्हाइसमध्ये एचएमडी व्हिडिओ आणि लो- लाइट अधिक उत्तम करून बेस्ट कॅमेरा देण्यासाठी कंपनीनं अधिक लक्ष दिलं होतं. कॅमेरावर काम केल्यानंतर कॅमेरा स्पीड आणि फोटो प्रोसेसिंग आधीपेक्षा चांगली झाली असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. '९.१ प्युअरव्ह्यू'मध्ये नवीन डिव्हाइसमध्ये युजर्सना अधिक चांगला कॅमेरा मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पंच होल कॅमेरा डिजाइन 'प्युअरव्ह्यू ९.१'चं डिजाइन आधीच्या व्हर्जनसारखं असणार आहे. 'नोकिया ९.१' मध्येही पंच होल डिस्प्ले मिळणार आहे. एचएमटी ग्लोबलच्या या नवीन डिव्हाइसमध्ये नवीन अँड्रोइड क्यू ऑपरेटिंग सिस्टम आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GwxmCI

Comments

clue frame