नवी दिल्ली चीनची कंपनी शाओमीच्या पोको एफ वन () या स्मार्टफोनमधील टचस्क्रीनमध्ये ग्राहकांना समस्या आल्याने कंपनीने फोन परत मागितले आहेत. स्मार्टफोनमध्ये IUI v10.3.5.0 अपडेट करण्यात आल्यानंतर ग्राहकांना टचस्क्रीनमध्ये समस्या येत आहेत. ज्या ग्राहकांच्या फोनमध्ये समस्या येत आहेत त्यांचे फोन दुरुस्त करून देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. पोकोफोनच्या ग्लोबल हेज एल्विन टीएसीईने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ज्या स्मार्टफोनमध्ये ही समस्या आली आहे. त्या सर्व फोनची तपासणी कंपनी करणार आहे. यासाठी ग्राहकांकडून हे फोन मागितले आहेत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एफ १ च्या युजर्सला स्क्रीन गोठणे, टचचे काम न होणे आणि टायपिंग करताना फोन हँग होणे, अशा ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. ज्या ग्राहकांच्या फोनमध्ये अशा समस्या येत असतील त्यांनी कंपनीच्या vzhaoxiaomi@gmail.com या मेलवर सविस्तर तक्रार करावी, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फोनची तक्रार करताना कोणती समस्या येत आहे. त्यासंबंधीची सविस्तर माहिती, व्हिडिओ, किंवा स्क्रीनशॉट पाठवावा, असेही कंपनीनं म्हटलं आहे. ग्राहकांना नवीन फोन दिला जाणार नसून जो फोन आहे तो केवळ दुरुस्त करून दिला जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NWDBWL
Comments
Post a Comment