२५०₹ पेक्षा कमी किंमतीचे बेस्ट प्रीपेड प्लान

मुंबई एअरटेल आणि जिओ यांना टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आपले दोन नवीन प्लान लाँच केले आहेत. या प्लानची किंमत २०५ रुपये आणि २२५ रुपये आहे. या दोन्ही प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटाची सुविधा आहे. रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर तीव्र स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे कमी किंमतीत अधिकाधिक फायदे देण्याचे प्रयत्न टेलिकॉम कंपन्यांनी सुरू केले आहेत. एअरटेल, वोडाफोन आणि जिओ यांचे २५० रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे प्लान ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. वोडाफोनचा २२५ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये ४८ दिवसांच्या वैधतेसह ४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये कोणताही टॉक टाइम नाही. मात्र, युजर्सना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग करता येणार आहे. या प्लानमध्ये ४८ दिवसांसाठी ६०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. त्याशिवाय वोडाफोन प्ले अॅपवर लाइव्ह टीव्ही आणि चित्रपट पाहता येणार आहेत. वोडाफोन २०५ चा प्लान वोडाफोनचा हा नवीन बोनस कार्ड प्लान आहे. या प्लानमध्ये कोणताही टॉकटाइम नाही. मात्र, फ्री कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स आहेत. या प्लानमध्ये ३५ दिवसांची वैधता आणि २ जीबी डेटा मिळतो. त्याशिवाय युजर्सना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग करता येणार आहे. त्याशिवाय, वोडाफोन प्ले अॅपद्वारे लाइव टीव्ही आणि चित्रपट पाहता येणार आहे. वोडाफोनचा १९९ रुपयांचा प्लानया प्लानमध्ये दररोज १.५ जीबी २जी/३जी/४जी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड लोकल, नॅशनल कॉलिंग, प्रतिदिन १०० एसएमएस आणि अनलिमिटेड रोमिंगसारखी सुविधा आहे. एअरटेलचा २४९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची असून दररोज २जीबी २जी/३जी/४जी डेटा मिळतो. त्याशिवाय अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगचे फायदे आहेत. त्याशिवाय दररोज १०० एसएमएसही मोफत पाठवता येणार आहे. एअरटेलचा १९९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये १.५ जीबीचा ४ जी डेटा मिळतो. त्याशिवाय अनलिमिटेड लोकल, एसटीडी, रोमिंग कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मोफत आहे. रिलायन्स जिओचा १९८ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दरदिवशी २ जीबीचा ४जी डेटा मिळतो. त्याशिवाय अनलिमिटेड व्हाइल कॉलिंग, प्रतिदिवस १०० मोफत एसएमएसही आहेत. २८ दिवसांची वैधता असणाऱ्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी म्हणजे महिन्याला ५६ जीबीचा डेटा मिळतो. रिलायन्स जिओचा १४९ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० फ्री एसएमएसही आहेत. त्याशिवाय जिओ अॅप्सचा फ्री अॅक्सेस देण्यात येतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XXprct

Comments

clue frame