चंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल

मुंबई मानवाने ठेवल्याच्या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे. या ऐतिहासिक घटनेचे सेलिब्रेशन गुगलने खास डूडलद्वारे केले आहे. डूडलमध्ये असणाऱ्या प्ले बटणावर क्लिक केल्यास 'अपोलो ११'च्या चंद्रमोहिमेच्या प्रवासाची भन्नाट माहिती मिळते. डूडलमधील अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये 'अपोलो ११' च्या मोहिमेची सर्व माहिती मिळते. विशेष म्हणजे अपोलो ११चे कमांड मॉड्युल पायलट मायकल कोलिन्स यांच्या आवाजात हा प्रवास घडतो. नासाच्या मिशनमध्ये मायकल कोलिन्स यांनी कंमाड मॉड्युल्डला चंद्रावर नेले होते. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन बज एल्ड्रीन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले होते. या साडेचार मिनिटांच्या अॅनिमेटेड व्हिडिओत डूडल आपल्या अपोलो ११ चा प्रवास दाखवतो. कोलिन्स यांच्या आवाजातील समालोचन या मिशनमधील महत्त्वाच्या गोष्टी उलगडून सांगतात. अपोलो ११ या यानाने १६ जुलै १९६९ रोजी उड्डाण केले होते. त्यानंतर तीन दिवसांनी जवळपास ३८६२४२ किमीचा प्रवास करुन कमांड मॉड्युल्स चंद्रापासून जवळपास ९६ किमी दूर असलेल्या कक्षेत स्थिरावले होते. त्याच्यानंतर नील आर्मस्ट्राँग आणि एल्ड्रीन यांनी चंद्रावर पाऊल ठेवण्याची तयारी केली होती. लुनार मॉड्युल्ड १२ मिनिटांसाठी चंद्रावर उतरले खरे, मात्र त्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अडचणींवर मात करून चंद्रावर पाऊल ठेवण्यास अंतराळवीर यशस्वी ठरले होते.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GhqgSq

Comments

clue frame