पाच रुपयांत खरेदी करा टीव्ही आणि मोबाइल

मुंबई चीनची कंपनी शाओमीने धमाकेदार ऑफर आणली आहे. शाओमीला भारतात पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेलची घोषणा केली आहे. शाओमीचा हा सेल २३ जुलै ते २५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. फ्लॅश सेलमध्ये ग्राहकांना अवघ्या पाच रुपयांत मोबाइल, टीव्ही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. शाओमीचा हा पाच रुपयांचा फ्लॅश सेल २३ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये रेडमी नोट ७ प्रो हा मोबाइल पाच रुपयांत खरेदी करता येणार आहे. ४ जीबी रॅम व ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज वेरिएंट असलेला मोबाइल ५ रुपयांत खरेदी करता येणार आहे. या फोनची बाजारपेठेत १५ हजाक ९९९ रुपये किंमत आहे. तर, २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता तुम्हाला रेडमी वाय३ हा मोबाइल खरेदी करण्याची संधी आहे. ३ जीबी रॅम व ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या वेरिएंट मोबाइलची बाजारपेठेत किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. त्याशिवाय, २३ जुलै सायंकाळी ४ वाजता २० इंचाचा एमआय लगेज ब्लू अवघ्या पाच रुपयात खरेदी करता येणार आहे. पाच रुपयांच्या सेलमध्ये १०० युनिट विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर, त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता शाओमीचा ३२ इंचाचा एम एलईडी टीव्ही ४ए प्रो पाच रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारपेठेत या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. त्याशिवाय, २४ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंतच्या सेलमध्ये रेडमी गो स्मार्टफोन आणि १० हजार एमएएच क्षमता असलेली पॉवर बँक ६९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. याची खरी किंमत ५१९८ रुपये आहे. तर, २० इंचाच्या एमआय लगेज आणि एमआय बॅण्ड एचआरएक्स तुम्हाला अवघ्या १२९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात याची किंमत ४२९८ रुपये आहे. या ऑफरमध्ये एमआय कॅज्यु्अल बॅकपॅक आणि बेसिक इअरफोन ३४९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32NiwRW

Comments

clue frame