वनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रोकॉर्ड

मुंबई : वनप्लस वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वनप्लसच्या ६ आणि ६टी या दोन मॉडेल्सवर अपडेट उपलब्ध झालं असून अपडेटनंतर स्मार्टफोनमध्ये 'स्क्रिन रेकॉर्ड' हे नवं फिचर उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसांतच सर्व वनप्लस स्मार्टफोन्सपर्यंत हे फिचर पोहोचेल. वनप्लस या कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या '७ प्रो' या फोनमध्ये स्क्रिन रेकॉर्डचं फिचर उपलब्ध होतं. या फिचरच्या मदतीने यूजरला स्क्रिनवर चालणारा ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करता येत होता. ग्राहकांनी या फिचरला भरपूर पसंती दिल्याने येत्या काही महिन्यात जून्या मॉडेल्सध्येही हे फिचर उपलब्ध करून देण्यात येईल असं कंपनीने जाहीर केलं. त्याप्रमाणे कंपनीने मे महिन्याच्या शेवटी हे फिचर ओपन बीटा अपडेटमध्ये उपलब्ध करून दिलं. आता स्टेबल व्हर्जनमध्येही हे फिचर उपलब्ध होणार आहे. नोटीफिकेशनद्वारे सूचना मिळेल या फिचर सोबतच नवीन अपडेटमधून वनप्लस ६ व ६ टी या दोन मॉडेल्सवर अॅंड्रॉईड सिक्यूरिटी पॅचसुद्धा येणार आहे. हे अपडेट वेगवेळ्या विभागात रोलआऊट होईल. काही दिवसांतच ओव्हर-द-एयर प्रणालीने अपडेट फोनमध्ये उपलब्ध होणार असून फोनवर येणाऱ्या नोटीफिकेशन द्वारे यूजरला याची सूचना दिली जाईल. वनप्लस ७ चा ही अपडेट येणार दरम्यान 'वनप्लस ७' साठीही 'ऑक्सीजन ओएस ९.५.७' हे नवीन अपडेट येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या अपडेटमुळे कॅमेरा, ऑटो ब्राइटनेस आणि जीपीएस अॅक्यूरसी यांचा दर्जा वाढेल. अपडेटने आणखीही उपयूक्त बदल स्मार्टफोनमध्ये होतील.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LvLOyS

Comments

clue frame