नवी दिल्ली स्वस्तातील स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुम्ही इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला खरेदी करू शकता. आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा पहिला सेल सुरू होणार आहे. टेक्नो फँटम ९ ला गेल्या आठवड्यात कंपनीनं लाँच केले होते. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे. या फोनसोबत १०० दिवसांपर्यंत फ्री रिप्लेसमेंट, ६ महिन्याचा फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट आणि एक महिन्याचा एक्सीडेंट वॉरंटी मिळणार आहे. ची वैशिष्ट्ये >> ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले >> १०८०X२३४० रिझॉल्यूशन पिक्सल >> मीडियाटेक हिलियो पी३५ प्रोसेसर >> ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज >> १६, ८, २ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा >> 4G VoLTE, वाई-फाई, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/ए-जीपीएस >> मायक्रो यूएसबी, ३.५ एमएमचा हेडफोन जॅक >> ३५०० mAh क्षमतेची बॅटरी
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30Crf7v
Comments
Post a Comment