नवी दिल्ली: नोटाबंदी आणि युपीआय कोड आल्यानंतर डिजीटल पेमेंटचे प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. पण त्याचवेळी डिजीटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फ्रॉड्समध्येही वाढ झाली आहे. या फ्रॉड्सला आळा घालण्यासाठी आता गुगल पेने एसएमएस नोटिफीकेशनी सुविधा दिली आहे. आतापर्यंत गुगल पेचा वापर करताना फक्त अॅप नोटिफीकेशन येत असत. आता कोणतीही देवाघावण करताना एसएमएस नोटिफीकेशनही येणार आहे. पैसे ट्रान्सफर करण्याआधी ग्राहकाची मेसेजवर परवानगी घेतली जाणार आहे. ग्राहकाने परवानगी दिल्यावरच पैशांची देवाणघेवाण केली जाईल. 'गुगल पे'च्या माध्यमातून फ्रॉड होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाणार आहे. 'लोकांचा गुगल पेवर विश्वास आहे. आणि हा विश्वास असाच कायम राहावा म्हणून आम्ही ही सुविधा आणली आहे.' अशी माहिती चे मॅनेजिंग डायरेक्टर अंबरिश केंघेंनी ही माहिती दिली आहे. यासोबत गुगलपेची स्कॅमपासून वाचवण्यासाठी अॅपची सुरक्षाही अजून तगडी केली जाणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GFkABT
Comments
Post a Comment