शाओमी अव्वल स्थानी; 'रियलमी'ही शर्यतीत

मुंबई: गेल्या काही वर्षांत देशांतर्गत स्मार्टफोनच्या बाजारपेठेत अव्वल स्थान प्राप्त केलेल्या शाओमीनं यंदाही बाजी मारली आहे. 'काउंटरपॉइंट रिसर्च'च्या अहवालानुसार २०१९च्या दुसऱ्या तिमाहीत शाओमीचा देशातील स्मार्टफोन बाजारात हिस्सा २८ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी कंपनीचा बाजारहिस्सा ३१ टक्के होता. २०१९च्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंगचा वाटा २५% इतका आहे. त्यामुळं दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ११ टक्के हिस्सा असलेली विवो कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन वर्ष जुनी कंपनी रियलमीने देखील बाजारात चांगलाच जम बसवल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी रियलमीचा बाजारात हिस्सा ७ टक्के इतका होता. यंदा हा टक्का वाढून तो ९ टक्क्यांवर आला आहे. या कंपनीला चौथ्या क्रमांकावर स्ठान मिळालं आहे. चिनी कंपन्यांची घोडदौड देशातील चिनी कंपन्यांनी स्मार्टफोन बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवून ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचवला आहे. विवो, रिअलमी आणि ओप्पो स्मार्टफोन कंपन्यांमुळे चिनी ब्रँडच्या हिश्श्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. शाओमीची रेडमी नोट ७ सीरिज सादर झाल्यानंतर पहिल्याच तिमाहीत १० लाख हँडसेट विक्रीचा टप्पा ओलांडण्यात कंपनीला यश आले आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SKmeHh

Comments

clue frame