नवी दिल्ली विवो कंपनीनं आपल्या वाय सीरिजचा वाय ९० () हा लाँच केला आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये म्हणजे हा सर्वसामान्यांना परवडणारा स्मार्टफोन आहे. तसेच या फोनमध्ये ४०३० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. वाय ९० हा फोन ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगात उपलब्ध करण्यात आला असून या फोनची किंमत केवळ ६ हजार ९९० रुपये इतकी आहे. २४ जुलैपासून हा फोन सर्व ऑफलाइन स्टोअरमध्ये आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ग्राहकांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी व ग्राहकांना नवीन उत्पादन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या वाय सिरीजअंतर्गत वाय ९० हा फोन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा असा फोन आहे. या मोबाइलची बॅटरी आणि मोठा डिस्प्ले ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो, असे विवो इंडियाच्या ब्रँड धोरणाचे संचालक निपूण मार्या यांनी सांगितले. वाय९० मध्ये एमटी ६७६१ हेलिओ ए२२ क्वॉड-कोअर प्रोसेसर आहे. तसेच १२ एनएम डिझाइन असलेला हा स्मार्टफोन २.० गिगाहर्टझ गती प्राप्त करतो. ज्यामुळे जलद प्रोसेसिंग गतीसह विजेचा वापर कमी होतो. या मोबाइलमध्ये ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. मागील बाजूस ८ मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा आहे. या कॅमे-यांमधील एआय फोटो अल्गोरिदम्स आपोआपपणे फेशियल एन्हान्समेंट्सची सुविधा देतात. यातील कॅमेऱ्याने उत्तम फोटो देखील कॅप्चर होतात. वाय९० मध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. ही स्टोरेज क्षमता २५६ जीबीपर्यंत वाढवता येते, ज्यामुळे ग्राहकांना अधिक प्रमाणात फोटो व फाइल्स स्टोअर करण्याची सुविधा मिळते. हा मोबाइल 'मेक इन इंडिया' चे पालन करतो तसेच हा फोन विवोच्या ग्रेटर नोएडा केंद्रामध्ये बनवण्यात आला आहे, असे निपून मार्या यांनी सांगितले.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Kbnwai
Comments
Post a Comment