आता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका!

मुंबई :यूट्यूबवरील गाण्याचा व्हिडिओ पाहायचा नसेल आणि केवळ ऑडिओ मोडवर गाणी ऐकायची असतील तर आता हे सहज शक्य होणार आहे. यूट्यूबच्या नव्या फिचरमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. या नव्या फिचरमध्ये यूजर्सला व्हिडिओ पाहण्याऐवजी केवळ गाणी ऐकता येणार असून त्यामुळे त्यांचा इंटरनेट डाटाही वाचणार आहे. म्युझिकवर वेगवेगळ्या गाण्यांचे व्हिडिओ उपलब्ध असतात. कोणताही व्हिडिओ बघताना प्रचंड प्रमाणात डाटा खर्च होतो. पण ऑडिओला व्हिडिओपेक्षा कमी डाटा लागतो. यूट्यूबच्या नव्या फिचरमुळे गाणाचा ऑडिओ आणि व्हिडिओ यांपैकी काहीतरी एकच निवडण्याचा पर्याय यूजर्सना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सहाजिकच डाटाची बचत होणार आहे. 'असं' करेल काम हे फिचर उपलब्ध झाल्यावर म्युझिक प्लेअरमध्ये वर एक टॉगल बटन दिसू लागेल. या बटनावर क्लिक केल्यावर सुरू असलेलं गाणं ऑडिओ अथवा व्हिडिओ प्रकारात चालू करण्याचा पर्याय दिसू लागेल. त्यापैकी जो पर्याय निवडला जाईल त्याप्रमाणे गाणं सुरू होईल. ५० लाख गाण्यांचा मॅच यूट्यूबच्या अधिकृत म्यूझिक अॅपमधून ५० लाख गाणी मॅच केली असल्याची माहिती यूट्यूबने दिली आहे. इतरही गाणी लवकरच मॅच करणार असल्याचं समजतं. असं होणार उपलब्ध यूट्यूब म्युझिक लॉन्च झाल्यापासूनच यूजर्स या फिचरची मागणी करत होते. यूट्यूब प्रिमियम आणि यूट्यूब म्यूजिक प्रिमियमच्या सर्व यूजर्ससाठी हे फिचर उपलब्ध असेल. अॅंड्रॉईड व आयओएस डिव्हाईसच्या नवीन अपडेटमध्ये हे फिचर उपलब्ध आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LYQVak

Comments

clue frame