जिओच्या १९८ ₹ रिचार्जवर रोज २ जीबी डेटा

नवी दिल्ली रिलायन्स जिओच्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल करण्यात आला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना पूर्ण महिनाभर सेवा मोफत दिली जाणार आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेटाऐवजी आता २ जीबी डेटा मिळणार आहे. १९८ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना आधी दररोज १.५ जीबी डेटा दिला जात होता. आता मात्र ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या डेटासह अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस दिला जाणार आहे. या सर्व प्लान्ससोबत जिओचे सर्व अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे. जिओच्या ग्राहकांनी ४४९ रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना तीन महिन्यांपर्यंत जिओची सेवा मिळणार आहे. या प्लानची वैधता ९१ दिवसांची आहे. तीन महिन्यात ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा म्हणजेच १३६.५ डेटा मिळू शकणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YPF8id

Comments

clue frame