मुंबई गुगलच्या आगामी फोनमध्ये नवीन फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान असणार आहे. यासाठी गुगलकडून चाचणीदेखील सुरू आहे. या चाचणीसाठी आवश्यक असणारा गुगल जमवत असून एका फेस डेटासाठी गुगल ३४० रुपये मोजत असल्याचे वृत्त आहे. गुगलचे हे नवे फिचर अॅपलच्या फेस आयडी या फिचरला टक्कर देण्यासाठी विकसित करण्यात येत असल्याची चर्चा आहे. न्यूयॉर्कमध्ये गुगलचे कर्मचारी रस्त्यावर उभे राहून लोकांना फेस डेटा देण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी त्यांना ५ डॉलर (जवळपास ३४० रुपये) देण्यात येत आहे. अनेक शहरांमध्ये अशाचप्रकारे फेस डेटा जमवण्यात येत असल्याचे गुगलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. फेस डेटा घेण्याआधी गुगलचे कर्मचारी लोकांची लिखीत परवानगी घेत असून एक अर्जही भरून घेत आहे. त्यानंतर त्यांचा चेहरा स्कॅन केला जातो. त्यानंतर त्यांना ५ डॉलरचे गिफ्ट कार्ड देण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून गुगलचा वापर करत असल्यामुळे सगळाच डेटा गुगल सर्व्हरवर आहे. त्यामुळे फेसडेटा देण्यात काहीच वेगळं वाटत नसल्याचे काहींनी सांगितले. तर, काहींच्या मते, डेटा प्रायव्हसी एक भ्रम असून चेहऱ्याचा फोटो आता खासगी राहिलाच नसल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली. गुगल कर्मचारी नागरिकांचा घेत असलेला फेस डेटा हा फोन स्टोरमध्ये सेव्ह करत आहेत. या फोनवर कव्हर असल्यामुळे तो कोणता फोन आहे, स्पष्ट कळत नाही. मात्र, काहींच्या मते हा फोन पिक्सल ४ आहे. एकदा युजर्स मंजूरी दिल्यानंतर या फोनचा सेल्फी मोड ऑन होतो. त्यानंतर वेगवेगळ्या अँगलने फेस डेटा स्कॅन होण्यास सुरुवात होते. यानंतर गुगलचे कर्मचारी अॅमेझॉन किंवा स्टारबक्सचा गिफ्ट कार्ड देतात. चेहरा स्कॅन करण्यास साधारणपणे पाच मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे एका युजरने सांगितले.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SEdlPt
Comments
Post a Comment