आयफोन फोटोग्राफी स्पर्धेत दोन भारतीयांची बाजी

मुंबई: आयफोन फोटोग्राफी पुरस्कार विजेत्यांच्या नावांची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विजेत्यांच्या यादीत यंदा दोन भारतीयांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील डिम्पी भलोतिया हिला 'सीरीज' श्रेणीत दुसरं स्थान मिळालं आहे. तर, कर्नाटकच्या श्रीकुमार कृष्णन याला 'सनसेट' श्रेणीत अव्वल स्थान मिळालं आहे. कृष्णन यानं हा 'अवॉर्ड विनिंग' फोटो 'आयफोन ६एस'च्या मदतीनं क्लिक केला आहे. आयफोनच्या या फोटोग्राफी स्पर्धेत 'फोटोग्राफर ऑफ द इयर' इटलीच्या 'गॅब्रिएला सिगिलिआनो' यांना मिळाला. तसच पोर्तूगालच्या डियोगो लेजला 'सी स्ट्रिप्स'साठी तर, रशियाच्या यूलिया इब्रेवाला 'सॉरी' या फोटोंसाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. चीनच्या पेंड हानो याला देखील त्याच्या 'अक्रॉस' श्रेणीतील फोटोसाठी सन्मानित करण्यात आलं आहे. श्रीकुमार कृष्णन याने क्लिक केलेला फोटो: डिम्पी भलोतियानं आयफोनमध्ये टिपलेला हा फोटो: फोटोग्राफी फोटो स्पर्धेत वेग-वेगळ्या १८ देशातील आयफोन युजर्सनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आणि पुरस्कारांचे हे १२ वे वर्ष असून आयफोनच्या कॅमेराचे महत्त्व आणि वेगळेपण याद्वारे अधोरेखीत करण्यात येतं. आयफोनच्या कॅमेरे हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून आलं आहे. आयफोनचं वेड असण्यामागं कॅमेरा हे देखील एक कारण असून दिवसेंदिवस कॅमेराचा दर्जा उत्तम होत आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y65jFc

Comments

clue frame